spot_img

मुंब्रा : सोशल मीडिया इन्फ्लुएंसर नदीम ‘बाबा’ खान यांच्या घराबाहेर गोळीबार

ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा-कौसा परिसरात सोशल मीडिया इन्फ्लुएंसर नदीम मोइनुद्दीन खान उर्फ ‘बाबा खान’ यांच्या घराबाहेर पहाटे गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात हल्लेखोरांनी खान यांच्या घरासमोर येत गोळीबार केला. या गोळीबारात घराबाहेर उभी असलेल्या त्यांच्या कारला गोळी लागून किरकोळ नुकसान झाले, तसेच हवेतही गोळ्या झाडून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि आर्म्स अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.

दरम्यान, या प्रकरणात एका संशयिताला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. पोलिसांनी परिसरात सुरक्षा वाढवली आहे आणि हल्ल्यामागील नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

587FansLike
23,808FollowersFollow
4FollowersFollow
4,214SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_imgspot_img

Latest Articles