spot_img

नाशिकमध्ये GST उपायुक्त एसीबीच्या जाळ्यात; 1.25 कोटींची लाच मागितल्याचा आरोप

नाशिकमध्ये राज्य कर (GST) विभागातील मोठे भ्रष्टाचार प्रकरण उघडकीस आले आहे. तपास लवकर पूर्ण करून देण्यासाठी सव्वा कोटी रुपये (1.25 कोटी) लाच मागितल्याच्या आरोपावरून दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) अटक केली आहे.

माहितीनुसार, या प्रकरणात राज्यकर उपायुक्त सोमनाथ दत्तू पागे, सहाय्यक राज्यकर आयुक्त मच्छिंद्र विठ्ठल दोंदे आणि खासगी दलाल अमित हिरामण जाधव यांना अटक करण्यात आली आहे.

1.25 कोटींची लाच मागितल्याचा आरोप

तक्रारदाराच्या कार्यालयावर GST संदर्भात कारवाई करण्यात आली होती. त्या प्रकरणाचा तपास लवकर पूर्ण करून देण्यासाठी अधिकाऱ्यांनी 1.25 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.

तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत थेट ACB कडे तक्रार केली. प्राथमिक पडताळणीत लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ACB ने सापळा रचला.

20 लाखांचा पहिला हप्ता घेताना पकडले

तडजोडीनंतर एकूण रक्कम 1 कोटी रुपयांवर निश्चित करण्यात आली होती. त्यातील पहिला हप्ता 20 लाख रुपये स्वीकारताना खासगी व्यक्तीला ACB पथकाने रंगेहात पकडले. त्यानंतर दोन्ही अधिकाऱ्यांनाही ताब्यात घेण्यात आले.

कार्यालयात रोख रक्कम जप्त

कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांच्या कार्यालयाची झडती घेण्यात आली. या वेळी सुमारे 2 लाख रुपये रोख रक्कम आढळून आली असून ती जप्त करण्यात आली आहे.

या प्रकरणी तिन्ही आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे नाशिकमधील GST विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

587FansLike
23,808FollowersFollow
4FollowersFollow
4,214SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_imgspot_img

Latest Articles