राज्य वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती समितीच्या दोन दिवसीय बैठकीदरम्यान Ram Shinde यांनी समिती सदस्यांची सदिच्छा भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला.
या भेटीत बदलत्या परिस्थितीत पत्रकारितेसमोर उभ्या राहणाऱ्या अडचणी आणि आव्हानांबाबत चर्चा करण्यात आली. पत्रकारांना येणारे प्रश्न आणि अडचणी वास्तवाचे भान ठेवून सोडवण्यासाठी आपण सकारात्मक आहोत, असे प्रा. राम शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.
या प्रसंगी समितीचे अध्यक्ष Yadu Joshi आणि माहिती संचालक Dr. Ganesh Mule यांनी प्रा. शिंदे यांचा सत्कार केला.
बैठकीला राज्य समिती सदस्य Navnath Dighe, Prakash Kulthe तसेच नाशिक विभागीय समितीचे अध्यक्ष Sudhir Lanke यांच्यासह राज्य समितीचे इतर सदस्य उपस्थित होते.
या बैठकीत पत्रकारांच्या कामाशी संबंधित मुद्दे, बदलत्या माध्यम क्षेत्रातील आव्हाने आणि अधिस्वीकृती प्रक्रियेतील काही प्रश्नांवरही चर्चा झाल्याची माहिती मिळाली.






