फलटण सातारा_ महाराष्ट्र विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यातील राजकारणात हालचालींना वेग आला आहे. सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना विधान परिषदेवर संधी द्यावी, अशी ठाम मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केली आहे. यासाठी उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांना निवेदन सादर करण्यात आले.संजीवराजेंच्या नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा विश्वासफलटणमधील शिवसैनिकांनी संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांनी केलेल्या विकासकामांमुळे आणि सर्वसामान्यांशी असलेल्या घट्ट नात्यामुळे ते कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय आहेत.